SRH vs LSG : हेनरिक क्लासेन ठरला दुर्दैवी! कोणाचीही चूक नसताना ‘असा’ झाला रनआऊट, पाहा VIDEO

SRH vs LSG Heinrich Klaasen Run Out Video Viral : टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान क्रिकेट खेळण्यासोबतच फलंदाजांना नशिबाचीही साथ हवी असते. बऱ्याचदा सामन्यात मिळाले जीवनदान फलंदाजासाठी वरदान ठरते. त्याचबरोबर, असे अनेक प्रसंग येतात जेव्हा नशीब फलंदाजासोबत खेळते. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले. जिथे हेनरिक क्लासेन दुर्दैवी ठरला. त्याला दुसऱ्या फलंदाजाने खेळलेल्या शॉटवर आपली विकेट वाचवता आली नाही. ज्यामुळे २६ धावांवर धावबाद झाला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेनरिक क्लासेनसोबत नक्की काय घडलं?
खरंतर, हेनरिक क्लासेन शानदार फलंदाजी करत होता आणि त्याने १७ चेंडूत २६ धावा केल्या होत्या. क्लासेनने २ चौकार आणि १ षटकार मारला होता आणि तो लखनौसाठी मोठा धोका असल्याचे दिसत होते. तथापि, डावाच्या १३ व्या षटकात, क्लासेनसोबत असे काही घडले, जे त्यालाही अपेक्षित नव्हते. गोलंदाज प्रिन्स यादवने चेंडू टाकला, ज्यावर नितीश रेड्डीने समोरच्या दिशेने शॉट मारला.
https://twitter.com/kuchnahi1269083/status/1905279701062435121
Heinrich Klaasen wickets is literally one of the most unfortunate wicket in cricket history ….. How a ball can deflect so perfectly…..😐#SRHvLSG pic.twitter.com/m9JZQqY3dK
— Dr Artistic Soul (@dr_artisticsoul) March 27, 2025
नितीशच्या बॅटमधून निघालेला शॉट अडवण्यासाठी प्रिन्सने त्याचा हातमध्ये घातला. ज्यामुळे चेंडू त्याच्या हाताला लागल्यानंतर चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरील स्टंपवर गेला. जिथे क्लासेन क्रीजच्या बाहेर आला होता, ज्यामुळे तो धावबाद झाला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अशा प्रकारे प्रिन्सच्या अद्भुत क्षेत्ररक्षणामुळे क्लासेनचा डाव संपुष्टात आला, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
हेही वाचा – SRH vs LSG : कोण आहे प्रिन्स यादव? ज्याच्या समोर ट्रॅव्हिस हेडने टेकले गुडघे, VIDEO होतोय व्हायरल
हैदराबादने लखनौला दिले १९१ धावांचे लक्ष्य –
नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्ससमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. २० षटकांत ९ गडी गमावल्यानंतर हैदराबादने धावफलकावर १९० धावा केल्या. संघासाठी ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी केली आणि २८ चेंडूत जलद ४७ धावा केल्या, तर अनिकेत वर्माने शेवटच्या षटकांमध्ये कहर केला आणि फक्त १३ चेंडूत ३६ धावा केल्या. नितीश रेड्डी यांनी ३२ धावा आणि क्लासेन यांनी २६ धावांचे योगदान दिले.





