RS Ambrish : कोण आरएस अंबरीश? ज्याला शिवम मावीच्या जागी सनरायजर्स हैदराबादमध्ये मिळाली संधी
RS Ambrish SRH : सनरायझर्स हैदराबाद संघाने युवा अष्टपैलू खेळाडू आर. एस. अंबरीश (R. S. Ambrish) याला संघात स्थान दिले आहे.

RS Ambrish Joins Sunrisers Hyderabad IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामातून सनराइजर्स हैदराबाद (SRH) संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी हैदराबाद संघाने युवा अष्टपैलू खेळाडू आर. एस. अंबरीश (R. S. Ambrish) याला संघात स्थान दिले आहे. या अनपेक्षित बदलामुळे आता सर्वच क्रिकेटप्रेमींच्या नजरा या युवा खेळाडूवर खिळल्या आहेत.
कोण आहे आर. एस. अंबरीश?
आर. एस. अंबरीशचा जन्म २८ मे २००७ रोजी तामिळनाडू येथे झाला. तो डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करतो. अंबरीशच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचे तर, त्याचे वडील आर. सुकुमार हे देखील एक माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी अंडर-१९ पातळीवर तामिळनाडू संघाचे नेतृत्व केले असून, सध्या ते चेन्नईमध्ये क्रिकेट प्रशिक्षक आहेत. अंबरीशला क्रिकेटचे प्राथमिक धडे देण्यामध्ये त्यांच्या वडिलांची मोठी भूमिका राहिली आहे.
🚨 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋 𝐀𝐍𝐍𝐎𝐔𝐍𝐂𝐄𝐌𝐄𝐍𝐓
RS Ambrish, the ICC Under-19 Cricket World Cup 2026 winner, joins our squad as Shivam Mavi’s replacement.
Go well, Ambrish 🧡 pic.twitter.com/nherHX6l3N
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 1, 2026
अंडर-१९ विश्वचषकातील दमदार कामगिरी –
RS AMBRISH TO SUNRISERS HYDERABAD 🥶🔥
– Ambrish replaces Shivam Mavi for IPL 2026. pic.twitter.com/O9vjO08TS1
— Johns. (@CricCrazyJohns) May 1, 2026
अंबरीशने नुकत्याच पार पडलेल्या अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत तो संयुक्तरीत्या भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने एकूण ११ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय, जेव्हा जेव्हा त्याला फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा त्याने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले.
देशांतर्गत क्रिकेटचा विचार करता, त्याने तामिळनाडूकडून दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने २ विकेट्स घेतले आहेत, तर फलंदाजीत २१.५० च्या सरासरीने ४३ धावा केल्या आहेत. शिवम मावीच्या जागी आलेला हा युवा खेळाडू आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





