Uddhav Thackeray | Nitesh Rane | काल १९ जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. पक्षाच्या ५९ व्या वर्धापदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. तसेच देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली. मंत्री नितेश राणे यांना देखील ठाकरेंना लक्ष्य केले. उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी निलेश राणे यांना लगावत हल्लाबोल केला. सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेले आहे. तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, असे ठाकरे म्हणाले. त्यांच्या या विधानावर सभागृहात एकच हशा पिकाला होता. डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थितांमधून नेपाळी नेपाळी असे आवाज आले. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि शिवसेनेवर बोलतोस. कोणता तरी एक बाप ठरवा, असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या बाप वक्तव्याचा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत खरपूस समाचार घेत एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा, असे म्हटले आहे. हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही कम ऑन किल मी, हिंमत असेल तर अंगावर या, फक्त येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या… येताना सरळ याल, पण जाताना आडवे होऊन जाल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषेला तिसरा पर्याय दिला आहे. या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. शासनाने घेतलेल्या हिंदी भाषेच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवलिला आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही, असा इशार त्यांनी सरकारला दिला आहे. हिंमत असेल तर गुजरातमध्ये हिंदीची सक्ती करून दाखवा, असे देखील उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले आहेत. हेही वाचा: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ४५ मिनिटांत ‘या’ मोठ्या मुस्लिम देशाचा पाकला २५ वेळा फोन ; म्हटले, ‘भाऊ, मी भारताला तुमच्यासाठी फोन करू का?’