‘ऑपरेशन सिंदूर’च्या ४५ मिनिटांत ‘या’ मोठ्या मुस्लिम देशाचा पाकला २५ वेळा फोन ; म्हटले, ‘भाऊ, मी भारताला तुमच्यासाठी फोन करू का?’

Pakistan on Operation Sindoor। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करण्यात आली. दरम्यान, ज्यावेळी ही कारवाई सुरु होती, भारतीय क्षेपणास्त्रे पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करत होती,त्यावेळी सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या म्हणण्यावरून भारताला कारवाई थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केला असल्याचा दावा पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी केला आहे. दार यांनी स्वतः एका मुलाखतीदरम्यान हा मोठा दावा केला आहे. इशाक दार यांनीही कबूल केले की जेव्हा भारताने नूर खान एअरबेस आणि शोरकोट एअरबेसवर हल्ला केला तेव्हा आम्ही भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो.
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार म्हणाले की, पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असताना भारताने नूर खान एअरबेस आणि शोरकोट एअरबेसवर हल्ला केला. याचा अर्थ असा की भारताने जलद गतीने कारवाई केली आणि पाकिस्तानला विचार करण्याची संधी दिली नाही. इतक्या लवकर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी प्रशासन आश्चर्यचकित झाले.
‘ तुम्ही बोलू शकता’ Pakistan on Operation Sindoor।
उपपंतप्रधान इशाक दार यांनी या मुलाखतीत, ‘भारताच्या हल्ल्यानंतर, पंतप्रधानांनी सशस्त्र दलांना प्रत्युत्तर देण्याचे अधिकार दिले होते, आम्हाला काय करायचे आहे याचे तपशील निश्चित करण्यात आले होते आणि आम्ही चार वाजल्यानंतर सुरुवात केली, परंतु मी दुर्दैवाने असे म्हणेन की भारताने पुन्हा २:३० वाजता तेच केले, त्यांनी त्याच रात्री शोरकोट एअर बेसवरील नूर खान एअरबेसवर पुन्हा हल्ला केला.’ म्हटले.
या युद्धात सौदी अरेबियाच्या भूमिकेबद्दल इशाक दार म्हणाले की, ‘या हल्ल्यानंतर फक्त ४५ मिनिटांनीमला सौदी प्रिन्स फैसल साहब यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की भाऊ मला समजले आहे की तुम्ही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलला आहात आणि जयशंकर थांबले तर तुम्ही थांबण्यास तयार आहात का?’
उपपंतप्रधान इशाक दार यांनी पुढे सांगितले की त्यांनी सौदी प्रिन्सला सांगितले की, हो पाकिस्तान यासाठी तयार आहे आणि भाऊ तुम्ही सौदी प्रिन्सशी बोलू शकता. इशाक दार यांनी पुढे सांगितले की सौदी प्रिन्सने नंतर त्यांना पुन्हा फोन केला आणि सांगितले की त्यांनी जयशंकर यांना हे सांगितले आहे. यावरून असे दिसून येते की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात सौदीने शांतपणे पण महत्त्वाची भूमिका बजावली. दार म्हणाले की, इस्लामाबादने अमेरिकेशीही संपर्क साधला या आशेने की भारत या प्रकरणात लष्करी तणाव आणखी वाढवू नये.
दारची कबुली पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानच्या इतर उच्च अधिकाऱ्यांनी पूर्वी केलेल्या दाव्यांच्या विरोधात आहे, ज्यांनी दावा केला होता की पाकिस्तानने भारताला कडक प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर, भारताला उत्तर देण्याऐवजी, पाकिस्तानचे संपूर्ण लक्ष भारताचा हल्ला टाळण्यावर होते. यासाठी पाकिस्तानने अमेरिका, सौदी अरेबिया, कतार सारख्या देशांकडून राजनैतिक मदत मागितली.
भारताने प्रथम हल्ला केला ; शाहबाज यांनीही स्वीकारले Pakistan on Operation Sindoor।
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, ज्यांनी पूर्वी मोठ्या गोष्टींची बढाई मारली होती, त्यांनीही नंतर, हे मान्य केले आहे की भारताने रावळपिंडी विमानतळासह अनेक क्षेत्रांना लक्ष्य करून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. शरीफ यांनी अलिकडच्या मुलाखतीत म्हटले आहे की, “भारताने पुन्हा ब्राह्मोस क्षेपणास्त्र हल्ले केले आणि रावळपिंडी विमानतळ आणि इतर ठिकाणांसह पाकिस्तानच्या विविध प्रांतांना लक्ष्य केले.”
शाहबाज शरीफ यांनी कबूल केले की पाकिस्तानने १० मे रोजी पहाटे ४:३० वाजता फजरच्या नमाजानंतर प्रत्युत्तर देण्याची योजना आखली होती, परंतु ९-१० मे च्या रात्री भारताने त्यापूर्वीच पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. यावरून असे दिसून येते की भारतीय सैन्याने केवळ प्रथम हल्ला केला नाही तर भारताने पाकिस्तानचा प्रत्युत्तर यशस्वीरित्या उधळून लावला.
ऑपरेशन सिंदूर
७ मे पासून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्या आणि लष्करी तळांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताच्या हल्ल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी स्थळांवर हल्ला करण्याची योजना आखली. तथापि, भारताने आणखी शक्तिशाली प्रत्युत्तर हल्ले सुरू केले, पाकिस्तानच्या लष्करी स्थळांवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडले. चार दिवसांच्या वाढत्या तणाव आणि सीमापार हल्ल्यांनंतर, भारताने पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून १० मे रोजी युद्धबंदीला सहमती दर्शवली.





