Himachal snowfall : हिमाचलमध्ये तुफान बर्फवृष्टी; मनाली-लेह महामार्ग बंद !

Himachal – हिमाचल प्रदेशातील उंच भागात तुफान बर्फवृष्टी सुरू झाली आहे. कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांच्या उंच भागासह शिमलाच्या नारकंडा आणि कुफरी येथेही बर्फवृष्टी होत आहे. या बर्फवृष्टीमुळे मनाली-लेह महामार्ग बंद झाला असून लडाखकडे जाणारी वाहने दारचा येथे थांबविण्यात आली आहेत.
हिमाचलमधील लाहौल-स्पिती येथे ३० सेमी बर्फवृष्टी झाली. तसेच केलांग (१५ सेमी), हंसा (५ सेमी) आणि कुकुमसेरी (३.२ सेमी) येथे बर्फवृष्टी झाली. शिमला आणि मनाली येथेही सकाळी काही काळ हलकी बर्फवृष्टी झाली.
याशिवाय अटल बोगदा रोहतांगमध्ये सकाळपासून अधूनमधून बर्फवृष्टी सुरू आहे. हवामान विभागाने गुरुवारी सखल आणि मध्यम टेकड्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची आणि उंच टेकड्यांमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मान्सूननंतरच्या हंगामात सरासरी ६.१ मिमीच्या तुलनेत ४४.२ मिमी पाऊस पडला, जो ६२५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.





