राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Maharashtra Rain School Update | राज्यातील अनेक भागात आज (गुरुवार) सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधारेमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यातच आजही रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रायगडमधील पाच तालुक्यामधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये रात्रभर अलिबाग, तळा, रोहा, महाड, पोलादपूर या भागात अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. Maharashtra Rain School Update |
त्यानुसार अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Rain School Update |
दरम्यान, गुरुवारी कोकणासह पालघर, रायगड, पुणे, नाशिकच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरु असून गुरुवारी सकाळीही पावसाचा जोर कायम आहे.
पुण्यात पावसाची सकाळपासूनच जोरदार हजेरी
तर पुण्यातही सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान आज आळंदी येथून होणार आहे. त्यापूर्वीच पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. Maharashtra Rain School Update |
हेही वाचा:





