Breaking news: पुणे जिल्ह्यात मुसळधार! शाळा-महाविद्यालयांना उद्या २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर

पुणे – पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.
मात्र, अश्यातच हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पिंपरी चिंचवड, पुणे शहर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळा उद्या दि. 26 जुलै रोजी बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे.
पुणेकरांना दिलासा, मागील 3 तासांपासून पाऊस थांबला :
मागील 3 तासापासून पुण्यातील पाऊस थांबला आहे. पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होईल. पण पाऊस थांबल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा
खडकवासला धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू :
खडकवासला धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू झाला आहे. टप्प्याटप्प्याने 15000 पासून ते 35000 पर्यंत पाणी वाढवलं जाणार आहे. धरणातून विसर्ग सुरू होताच सिंहगड रोडवरच्या 15 सोसायटीमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं आहे.
काही वेळापूर्वी इथलं पाणी कमी झालं होतं, परंतु आता इथे कमरेएवढी पाणी पातळी झाली आहे. या भागामध्ये आणखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने 160 जणांना इथून सुरक्षित हलवलं आहे.





