१० लाखांचा आरोग्य विमा ते १२०० मुलांना लॅपटॉप; दिल्लीत पहिल्यांदाच १ लाख कोटींचे बजेट, तुमच्यासाठी काय? जाणून घ्या
Updated On:

Delhi Budget 2025 : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पाहिलांदाच १ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महिला समृद्धी योजनेसाठी ५१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील. तसेच यमुना स्वच्छ करण्यासाठी ९ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. याशिवाय अटल कॅन्टीन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, झोपडपट्ट्यांचा विकास आणि दिल्लीकरांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा अशा मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पातील कोणत्या मोठ्या घोषणा आहेत ते जाणून घेऊयात…
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, दिल्लीतील लोकांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा. यामध्ये केंद्र सरकारकडून ५ लाख, तर राज्य सरकारकडून सरकारकडून ५ लाख
- दिल्लीतील यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी आणि स्वच्छ गटारांच्या पाण्यासाठी ९००० कोटी
- महिला समृद्धी योजनेसाठी ५१०० कोटी रुपयांची तरतूद
- गर्भवती महिलांसाठी मुख्यमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत २१० कोटी
- झोपडपट्टी विकासासाठी दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड (DUSIB) ला 696 कोटी
- आरोग्यासाठी ६८७४ कोटी
- दिल्लीतील १०० सरकारी शाळांमध्ये भाषा प्रयोगशाळा उघडल्या जातील. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर असलेल्या
- प्रयोगशाळेत वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातील. यासाठी २१ कोटी
- स्मार्ट क्लासेस तयार करण्यासाठी १०० कोटी
- पंडित मदन मोहन मालवीय विद्या शक्ती मिशन योजना सुरू केली जाईल. या योजनेसाठी २१ कोटी
- शाळांमध्ये १७५ नवीन संगणक प्रयोगशाळा बांधल्या जातील, ज्यासाठी ५० कोटी
- दहावी उत्तीर्ण होणाऱ्या १२०० मुलांना स्मार्ट लॅपटॉप
- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार ३००० कोटी रुपयांचे टॉप-अप
- दिल्लीत पाणी चोरी थांबवण्यासाठी १५० कोटी
- अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत १०० अटल कॅन्टीन उघडण्यात येतील. यासाठी १०० कोटी
- दिल्लीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी ११७ कोटी
- दिल्लीत सामाजिक पेन्शन योजनेद्वारे ९.५ लाख लोकांना पेन्शन दिले जाईल
- दिल्ली सरकारने पर्यावरण आणि वन विभागासाठी ५०६ कोटी
- वाहतुकीसाठी १२,९५२ कोटी
- इलेक्ट्रिक बसेसची संख्या २००० वरून ५००० पर्यंत वाढवली जाईल
- मेट्रोसाठी २९२९ कोटी
- दिल्लीतील ऊर्जेसाठी ३८४७ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.
- दिल्लीतील पूर रोखण्यासाठी ६०३ कोटी रुपयांची तरतूद




