पिंपरी | वडगावमध्ये ४६ दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मावळ पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात नेत्रदोष, कर्णदोष, वाचादोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक अक्षमता या विविध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा पाटील, डॉ. मनिषा गावंडे, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई, डॉ. दर्पण महेशगौरी, अश्विनी वनारसे, शोभा वहिले यांचे सहकार्य मिळाले. शीतल शिशुपाल, स्मिता जगताप, साधना काळे, सुमित्रा कचरे, शकिला शेख, लता वणवे आदींनी संयोजन केले.





