Pune District : 295 जणांची आरोग्य तपासणी, 50 जणांचे रक्तदन

अॅड. संजय शिवाजीराव काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
जुन्नर – जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, संस्थेचे अध्यक्ष अॅड. संजय शिवाजीराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिरात 295 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी 50 जणांनी रक्तदान केले.
जुन्नर येथील यशवंतराव चव्हाण मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणि श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या बीबीए व बीसीए विभागाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्ती काळे यांनी केले. संस्थेच्या खजिनदार कांता मस्करे, विश्वस्त अॅड. अविनाश थोरवे, अनिल जोगळेकर, बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजणे,
महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रतिनीधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, उपप्राचार्य डॉ. आर. डी. चौधरी, प्रभारी प्रबंधक प्रा. मनीषा कोरे, कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा. प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा. समीर श्रीमंते आदी मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉ. राजश्री पाचगावकर,
डॉ. हिमांशू गर्ग, डॉ. शुभम गुप्ता आदींनी आरोग्य तपासणी केली. आयान तिरंदाज याने शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रास्तविक बीबीए व बीसीए विभाग प्रमुख प्रा. मयुरी कुंभोजे यांनी, सूत्रसंचालन अल्फिया पठाण यांनी विद्यार्थी समन्वयक अनस शेख याने आभार मानले.





