Babar Azam : ‘…म्हणून बाबरला संघातून वगळलं’, पाकिस्तान संघाच्या कोचने सांगितलं खरं कारण, पाहा VIDEO

Mike Hesson on Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) रविवारी यूएईमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिका आणि त्यानंतरच्या आशिया कपसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात अनुभवी फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ निर्माण झाली आहे. ती म्हणजे बाबरला का वगळण्यात आले? याबाबत कोच माइक हेसन यांनी खुलासा केला आहे.
सलमान अली आगा याच्या नेतृत्वाखालील या संघात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि डावखुरा गोलंदाज सलमान मिर्झा यांचा समावेश आहे. बाबर आझम गेल्या वर्षीपर्यंत टी-२० संघाचा कर्णधार होता, परंतु सातत्याने खराब कामगिरीमुळे त्याला पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आले आहे.
माइक हेसन बाबरबद्दल काय म्हणाले?
There’s no doubt Babar has been asked to improve in some areas, particularly against spin and in terms of his strike-rate – Mike Hesson
VC: PCB#Cricket | #Pakistan | #MikeHesson | #BabarAzam | #Lahore | #AsiaCup pic.twitter.com/XfUmkQOMEP
— Khel Shel (@khelshel) August 17, 2025
पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी बाबर आझमला संघात स्थान न मिळाल्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, “बाबर आझमला काही विशिष्ट बाबींवर काम करण्यास सांगितले आहे, विशेषत: फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याच्या स्ट्राइक रेटवर. तो सध्या या गोष्टींवर खूप मेहनत घेत आहेत. बाबरसारख्या खेळाडूला बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये खेळण्याची संधी आहे, जिथे तो टी-२० क्रिकेटमधील आपली कमतरता सुधारू शकतो. तो इतका उत्तम खेळाडू आहे की, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आशिया कपसाठी उपलब्ध असणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर
तिरंगी मालिका आणि आशिया कप –
Mike Hesson said, “Babar Azam has an opportunity to play in the BBL and show that he’s improving in the areas needed in T20Is. He’s too good a player for us not to consider.” pic.twitter.com/JhTeBFp6P6
— Sheri. (@CallMeSheri1_) August 17, 2025
आशिया कप २०२५ ही टी-२० स्वरूपातील स्पर्धा ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होईल. त्यापूर्वी, २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत शारजाह येथे सलमान अली आगा याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ अफगाणिस्तान आणि यजमान युएई यांच्याविरुद्ध तिरंगी मालिका खेळणार आहे.
हेही वाचा – Dewald Brevis : ब्रेव्हिसचा जलवा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडत मोडला कोहलीचा खास विक्रम
आशिया कप २०२५ साठी पाकिस्तानचा संघ:सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, सॅम अयुब, सलमान मिर्झा.





