Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आशिया कपसाठी उपलब्ध असणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर

बुमराहची उपलब्धता निश्चित –
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ने बीसीसीआयला आपल्या उपलब्धतेबाबत माहिती दिली आहे. सूत्रांनुसार, बुमराहने निवड समितीला कळवले आहे की, तो आशिया कपसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे त्याची संघात निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. इंडियन एक्सप्रेसच्या सूत्राने सांगितले, “बुमराहने निवड समितीला सांगितले आहे की, तो आशिया कपसाठी खेळू शकतो. पुढील आठवड्यात निवड समिती यावर चर्चा करेल.”
टी-२० विश्वचषक २०२४ मधील शेवटचा सामना –
🚨 *JASPRIT BUMRAH FOR ASIA CUP* 🚨
– Bumrah has informed the selectors that he is available for Selection for the Asia Cup. (Devendra Pandey from Express Sports)#JaspritBumrah #AsiaCup2025 pic.twitter.com/1X6zIArVRc
— Ritesh Sports 18 (@RiteshSports) August 17, 2025
बुमराहने यापूर्वी शेवटचा टी-२० सामना टी२० विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. हा सामना अंतिम सामना होता, ज्यामध्ये भारताने रोमांचक विजय मिळवत विश्वचषकावर कब्जा केला होता. त्यानंतर बुमराहने कोणताही टी-२० सामना खेळलेला नाही. आता तो थेट आशिया कप २०२५ मध्ये मैदानात उतरू शकतो.
हेही वाचा – Dewald Brevis : ब्रेव्हिसचा जलवा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडत मोडला कोहलीचा खास विक्रम
आशिया कप स्पर्धेतील भारताचे सामने –
आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध होईल. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. मात्र, भारत हा सामना खेळेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आशिया कपसाठी निवडला जाणारा १५ सदस्यीय भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ साठीही प्रमुख दावेदार मानला जाईल. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





