Manjari Fadnis : ‘त्याला पोत्यात भरून फेकलं’; प्रसिद्ध अभिनेत्रीने रडत रडत सांगितली हृदयद्रावक कहाणी, नेमकं काय घडलं?
Manjari Fadnis : अखेर सोसायटीतील एका व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.

Manjari Fadnis : अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका मंजरी फडणीस सध्या एका भावनिक व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, यावर विविध प्रतक्रिया उमटत आहेत. व्हिडिओत मंजरी रडताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्या सोसायटीतील ‘माइकी’ नावाच्या कुत्र्याच्या निर्घृण हत्येची माहिती देताना तिला अश्रू अनावर झाले. या घटनेने ती प्रचंड हादरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंजरी म्हणाली की, “हा व्हिडीओ मी कदाचित कधीच बनवला नसता, पण हे सांगणं आवश्यक आहे. माइकी आमच्या सोसायटीचा 2019-20 पासून एक भाग होता. तो अतिशय प्रेमळ आणि सर्वांचा लाडका कुत्रा होता.” (Manjari Fadnis)
मंजरीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी माइकी अचानक बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांनी पोस्टर्स लावले, सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधला आणि अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. अखेर सोसायटीतील एका व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. (Manjari Fadnis)
View this post on Instagram
अभिनेत्रीने सांगितले की, माइकी तळघरात शांतपणे झोपलेला असताना त्याच्यावर लोखंडी सळी किंवा काठीने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला एका पोत्यात भरून खाडी परिसरात फेकून देण्यात आले. या घटनेचे वर्णन करताना मंजरीला अश्रू अनावर झाले. (Manjari Fadnis)
हेही वाचा : Shaktipeeth Mahamarg : ‘गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,’ कोल्हापुरात हजारो शेतकरी एकवटले
“तो अर्धवट जिवंत होता की नाही, हे आम्हाला माहीत नाही. पण आम्हाला त्याचा मृतदेह सापडला. अशा क्रूर मानसिकतेच्या लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे ती म्हणाली.

Manjari Fadnis
व्हिडीओसोबतच्या पोस्टमध्ये मंजरीने लिहिले की, “आमच्या माइकीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. आम्ही त्याच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी लढणार आहोत. कोणत्याही प्राण्याबाबत अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी दोषींना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे.” या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून अनेकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.





