Shaktipeeth Mahamarg : ‘गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,’ कोल्हापुरात हजारो शेतकरी एकवटले
Shaktipeeth Mahamarg : मोजणी अधिकारी आणि संतप्त शेतकऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन केले जात आहे. या मोर्चामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील हे सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर येथील शेतकऱ्यांची या मोर्चात उपस्थिती होती. ‘गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,’ अशी मागणी मोर्चातील शेतकऱ्यांची केली
“आम्हाला आत्महत्या करायला लागली तरी चालेल, आमचे रक्त सांडलं तरी चालेल, मात्र आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही”, अशी ठाम भूमिका आंदोलनातील महिलांनी घेतली आहे.शक्तीपीठ महामार्गाची धग सांगली जिल्ह्यातही तीव्रतेने जाणवत आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील विटा जवळील नागेवाडी आणि माऊली भाग्यनगर भागात प्रशासनाकडून महामार्गासाठी ‘ड्रोन मोजणी’ सुरू करण्यात आली होती.
याची माहिती मिळताच शेकडो शेतकरी शेतात गोळा झाले. “आमचा जीव जाईल पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही,” अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी थेट ड्रोन मोजणीच बंद पाडली. या वेळी मोजणी अधिकारी आणि संतप्त शेतकऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल आणि तहसीलदार योगेश टोणपे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, “जेव्हा आम्हाला महामार्गच नको, तर मोजणी कशासाठी करताय?” असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आणि अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
नव्या मार्गाची गरज काय? – सतेज पाटील (Shaktipeeth Mahamarg)
सतेज पाटील यांनी म्हटले की, आंदोलक आणि शेतकऱ्यांना नको असलेला शक्तिपीठ महामार्ग करु नये. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाला समांतर असा नागपूर-रत्नागिरी मार्ग आहे. मग असे असताना नव्या मार्गाची गरज काय? सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. हे सगळे शेतकरी शक्तीपीठ महामार्ग झाल्यास भूमिहीन होतील. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आणि महापूराचा तडाखा बसतो. शक्तीपीठ महामार्ग झाल्यास महामार्गामुळे अनेक हेक्टर शेती उद्ध्वस्त होईल.” (Shaktipeeth Mahamarg )
ही धार्मिक स्थळे जोडली जाणार (Shaktipeeth Mahamarg)
या सुधारित मार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे व धार्मिक स्थळे अत्यंत कमी अंतरात जोडली जाणार आहेत. त्यामध्ये माहूर (रेणुकामाता), औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, परळी वैद्यनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर महालक्ष्मी, पन्हाळा- ज्योतिबा, माहूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी असे इतर अनेक धार्मिक स्थळांनाही सुलभ जोडणी मिळणार आहे. Saktipeeth Highway
हेही वाचा:






