Sharad Pawar’s health : “त्यांना धावपळ कमी करण्याची आणि आराम करण्याची गरज आहे”; शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काही काही दिवसांपूर्वीच छाती आणि श्वासनलिकेतील संसर्गाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Sharad Pawar’s health – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांची आज प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. यानंतर दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्यांची कन्या आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांना डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता होण्याची समस्या झाली आहे. यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत.
हे डिहायड्रेशनमुळे झाले असून त्यांना आपली धावपळ कमी करण्याची आणि आराम करण्याची गरज आहे. तसेच, शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देत एकप्रकारे नियमित चेकअपचा हा भाग असल्याचे त्यांनी सूचवले आहे.
दरम्यान, नरिमन पॉइंट येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बोलावलेल्या एका बैठकीत सुप्रिया सुळे या सहभागी होत्या. मात्र, वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच त्या बैठक अर्धवट सोडून थेट रुग्णालयात पोहोचल्या.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काही काही दिवसांपूर्वीच छाती आणि श्वासनलिकेतील संसर्गाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.






