Sharad Pawar : शरद पवार पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे तातडीने रवाना
Sharad Pawar : सुप्रिया सुळेंची एक्सवर पोस्ट करत माहिती

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून दिली आहे.
‘डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे.
आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी मनापासून आभार मानते,’ असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली नियोजित बैठक अर्धवट सोडून तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.
We are admitting Baba to Breach Candy Hospital. It appears to be dehydration.
He needs to slow down and travel less, but Baba just doesn’t listen. He loves his work far too much.
Thank you all for your concern and good wishes.🙏🏻
डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते.
बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार. 🙏🏻
— Supriya Sule (@supriya_sule) November 26, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा:





