Hormuz strait : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाद पुन्हा सुरू; इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे प्रत्युत्तर
Hormuz strait : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीचा करार मोडीत निघण्याची चिन्हे

Hormuz strait : होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात एका व्यापारी मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई केल्याचा दावा केला आहे. कारवाईमुळे इराण आणि अमेरिका यांच्यात झालेला युद्धबंदीचा करार अवघ्या नऊ दिवसांतच मोडीत निघण्याची चिन्हे आहेत.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी होर्मुझ सामुद्रधुनीतून ओमानच्या किनाऱ्याजवळून जात असलेल्या एका व्यापारी जहाजावर ड्रोनद्वारे हल्ला केला. या घटनेनंतर २६ जून रोजी अमेरिकन सैन्याने इराणच्या लष्करी तळांवर कारवाई केली.
सिंगापूरच्या ध्वजाखाली नोंदणीकृत एम/व्ही एव्हर लव्हली या मालवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला एकतर्फी आक्रमक ड्रोनद्वारे करण्यात आल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. इराणने एकूण चार ड्रोन डागले होते, त्यापैकी तीन ड्रोन अमेरिकेने हवेतच पाडले, तर एका ड्रोनचा फटका जहाजाच्या वरच्या भागाला बसला. सुदैवाने, या हल्ल्यात जहाजावरील कोणालाही दुखापत झाली नाही.
अमेरिकेचे जोरदार प्रत्युत्तर (Hormuz strait)
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सेंट्रल कमांडने २६ जून रोजी इराणवर लष्करी कारवाई केली. अमेरिकेच्या एफ-३५ आणि एफ-१६ लढाऊ विमानांनी इराणच्या किनारपट्टीवरील तीन आणि केशम बेटावरील एका ठिकाणासह एकूण चार लष्करी तळांना लक्ष्य केले.
या घटनेनंतर, आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनाने फारसच्या आखातात अडकलेल्या जहाजांच्या सुटकेची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. इतर जहाजांच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, असे संघटनेने म्हटले आहे. Hormuz strait
त्यानंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवण केंद्रांवर तसेच किनारी भागातील रडार ठिकाणांवर हल्ले केल्याचे सांगितले. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर, “इराणने केलेला हा हल्ला युद्धबंदी कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील,” असे म्हणत इशारा दिला.

Hormuz strait : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाद पुन्हा सुरू; इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे प्रत्युत्तर
जलमार्गावरील कर (Hormuz strait)
अमेरिका आणि इराण यांच्यात १७ जून रोजी एक १४ कलमी युद्धबंदी करार झाला होता. या करारानुसार ६० दिवसांसाठी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून कोणताही कर न घेण्याचे इराणने मान्य केले होते. हा जलमार्ग जागतिक तेल आणि वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
परंतु, इराणच्या अधिकाऱ्यांनी ६० दिवसांनंतर पुन्हा कर वसूल करण्याची भाषा सुरू केली. तर ट्रम्प यांच्या मते इराणने कोणताही कर न लावण्याचे आश्वासन दिले होते. याच वादातून दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा बिघडले.
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे युद्धबंदीच्या तत्त्वांचे पालन करत नसल्याची टीका केली आहे. Hormuz strait
हेही वाचा:





