Akriti Agarwal : जवळच्या व्यक्तींमुळे नातं तुटलं; पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, पुन्हा एकत्र आल्याची दिली माहिती
Akriti Agarwal : आकृति अग्रवालने सोशल मीडियावर ‘A Personal Clarification’ या शीर्षकाखाली एक पोस्ट शेअर केली आहे.

Akriti Agarwal and Prithvi Shaw patch up : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृति अग्रवाल यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. साखरपुडा मोडल्याच्या चर्चांनंतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आकृतिने सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
‘A Personal Clarification’ या शीर्षकाखाली आकृतिने मांडली बाजू (Akriti Agarwal)
आकृति अग्रवालने सोशल मीडियावर ‘A Personal Clarification’ या शीर्षकाखाली एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने साखरपुडा मोडण्यामागील परिस्थिती आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या मतांचा आपल्या निर्णयावर प्रभाव पडल्याचं तिने स्पष्ट केलं.
आकृतिने पोस्टमध्ये म्हटलं की, साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेताना तिने आपल्या जवळच्या व्यक्तींशी नात्याबाबत चर्चा केली होती. त्यांना या नात्याची अधिक चांगली समज असल्याचं वाटल्याने त्यांच्या दृष्टिकोनाचा आपल्या होणाऱ्या पतीकडे आणि नात्याकडे पाहण्याच्या विचारांवर परिणाम झाला.
View this post on Instagram
‘माझी दिशाभूल झाली’, आकृतिचा खुलासा (Akriti Agarwal)
आकृतिने पुढे म्हटलं की, तिची दिशाभूल झाली असावी आणि दोघांमध्ये ज्या प्रामाणिक संवादाची गरज होती, तो होण्याआधीच त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र, नेमक्या कोणत्या व्यक्तींमुळे गैरसमज निर्माण झाले किंवा त्यांची नावं काय आहेत, याचा खुलासा तिने केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणात घेतलेल्या निर्णयांची आणि त्यामुळे झालेल्या वेदनेची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचंही आकृतिने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
कुटुंबीयांशी संवादानंतर पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय (Akriti Agarwal)
आकृतिने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी आपल्या कुटुंबीयांशी मोकळेपणाने संवाद साधला आणि एकमेकांची बाजू समजून घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या नात्याचा पाया परस्पर सामंजस्य, विश्वास आणि प्रेमावर असावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली. तसेच, दोघेही एकमेकांसाठी पुरेसे असून त्यांच्या नात्याबाबतचे निर्णय त्यांनी स्वतः घ्यावेत, असंही तिने स्पष्ट केलं.





