हाथरस प्रकरण किरकोळ; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे अकलेचे तारे
Updated On:

कानपूर – हाथरसमध्ये दलित युवतीवर झालेला कथित बलात्कार हा किरकोळ मुद्दा आहे. डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे अकलेचे तारे उत्तर प्रदेशचे वीज आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अजितसिंह पाल यांनी तोडले.
विरोधक आमच्यावर टीका करत आहेत, त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. त्यांच्याकडे कोणतेही महत्त्वाचे मुद्दे नसल्याने ते अशा लहानसहान मुद्द्यांचा वापर वातावरण निर्मितीसाठी करत आहेत. ते जनतेच्या हितासाठी काहीही करत नाहीत, असेही पाल यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे, यात जे काही निष्पन्न होईल ते लोकांपुढे ठेवण्यात येईल. मात्र, डॉक्टरांनी बलात्कार वगैरे झालाच नसल्याचे सांगितले आहे.




