Maharashtra Politics : मोठा राजकीय भूकंप; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची तडकाफडकी निवृत्ती?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वतः न लढवण्याची मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातील माजलगावच्या राजकारणात आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका घोषणेने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वतः लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. (Maharashtra Politics)
त्याऐवजी आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माजलगावच्या राजकारणात सोळंके कुटुंबातील नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
काय म्हणाले प्रकाश सोळंके?
एका विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “आगामी विधानसभा निवडणुकीत मी स्वतः उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येणार नाही. माझा पुतण्या जयसिंह सोळंके यांना आमच्याकडून उमेदवारी दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
या घोषणेमुळे जयसिंह सोळंके यांच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, प्रकाश सोळंके यांनी सक्रिय राजकारणातून पूर्ण निवृत्ती घेतल्याचे जाहीर केलेले नाही. त्यांनी केवळ आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका मांडली आहे. (Maharashtra Politics)
यापूर्वी मंत्रीपदाबाबत व्यक्त केली होती नाराजी
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. (Maharashtra Politics)
आपल्याला जात आडवी येत असल्याने मंत्रीपदाची संधी मिळत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच, आपण ओबीसी समाजात जन्मलो असतो तर मंत्रीपदाची संधी मिळाली असती, असेही त्यांनी म्हटले होते. बीड जिल्ह्यातील गेल्या ४५ वर्षांच्या राजकीय इतिहासात मराठा समाजातील व्यक्तीला कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. (Maharashtra Politics)
माजलगावच्या राजकारणात नवी चर्चा
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय चर्चा सुरू असताना दुसरीकडे प्रकाश सोळंके यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे माजलगावच्या आगामी विधानसभा निवडणुकीत जयसिंह सोळंके यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





