Hasan Mushrif case : उच्च न्यायालयाचा दणका; किरीट सोमय्यांची ‘त्या’ प्रकरणी होणार चौकशी

मुंबई – भाजपच्या विरोधातील विविध नेत्यांच्या कथित घोटाळ्यांचा पर्दाफाश करून सतत चर्चेत राहणारे भाजप नेते किरीट सोमय्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफांविरोधातील न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याच्या चौकशीचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.
सोमय्या यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मुश्रीफ यांच्याविरोधातील फसवणूक केल्याप्रकरणाची न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत मिळवली होती. या प्रकरणी पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश चौकशी करणार आहेत.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत 24 एप्रिल 2023 पर्यंत सक्तीच्या कारवाईपासून संरक्षणही दिले आहे. या प्रकरणी अद्याप सत्ताधारी भाजपा व सोमय्या यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.





