“….नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”; UNमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले

India Vs Pakistan | पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढला आहे. याचदरम्यान आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानला फटकारले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेदरम्यान निवेदन देताना संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला.
“पाकिस्तानच्या प्रतिनिधीने अनेक मुद्द्यांवर केलेल्या निराधार आरोपांना मला उत्तर देण्यास भाग पाडले जात आहे. भारताने गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सीमेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. यामध्ये मुंबई शहरावरील 26/11 च्या भयानक हल्ल्यापासून ते एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या क्रूर सामूहिक हत्येपर्यंतचा समावेश आहे,” असे राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी म्हंटले आहे. India Vs Pakistan |
‘दहशतवाद्यांच्या बचावासाठी सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर केला’
“पाकिस्तानी दहशतवादाचे बळी प्रामुख्याने नागरिक आहेत, कारण त्यांचे उद्दिष्ट आपल्या समृद्धी, प्रगती आणि मनोबलावर हल्ला करणे आहे. अशा देशाने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेवरील चर्चेत भाग घेणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान आहे, पाकिस्तान दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी वारंवार सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर करत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंतिम संस्कारमध्ये पाकिस्तान लष्कारातील अधिकारी, पोलीस आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी सहभागी झाले होते, त्याचा व्हिडिओ सर्व जगाने पाहिला आहे,” असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. India Vs Pakistan |
दरम्यान, पाकिस्तानी प्रतिनिधीने अनेक मुद्द्यांवर भारतावर निराधार आरोप केल्याने त्या आरोपांना उत्तर देण्यात आले. नागरिक आणि दहशतवादी यांच्यामध्ये जो देश फरक करत नाही त्याला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील सीमावर्ती गावांवर गोळीबार केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला. तसेच भारतातील धार्मिक स्थळांना पाकिस्तानने जाणूनबुजून लक्ष्य केले. याबद्दलची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रसंघात दिली आहे. India Vs Pakistan |
हेही वाचा:





