Haryana Vidhan Sabha Results 2024 । आज हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागणार आहे. त्यामुळे भाजप सत्तेत राहणार की बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागणार हे स्पष्ट होणार आहे. पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या काँग्रेसबाबतही चित्र स्पष्ट होणार आहे. काही तासात हरियाणा निवडणुकीच्या निकालाचे ट्रेंड समोर येऊ लागतील. जाणून घेऊया लेटेस्ट या अपडेट एलनाबाद मतदारसंघातून अभय चौटाला आघाडीवर हरियाणातील एलेनाबाद मतदारसंघातून आयएनएलडीचे अभय चौटाला पिछाडीवर आहेत. अंबाला कँटमधून अनिल विज आघाडीवर हरियाणाच्या अंबाला कँटमधून अनिल विज आघाडीवर आहेत. रेवाडीतून चिरंजीव राव पिछाडीवर हरियाणाच्या रेवाडीतून काँग्रेसचे चिरंजीव राव पिछाडीवर आहेत. आदित्य सुरजेवाला कैथलमधून आघाडीवर हरियाणातील कैथल मतदारसंघातून काँग्रेसचे आदित्य सुरजेवाला आघाडीवर तोशामच्या श्रीती चौधरी आघाडीवर हरियाणाच्या तोशाम मतदारसंघातून भाजपच्या श्रीती चौधरी आघाडीवर आहेत. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगट आघाडीवर हरियामाच्या जुलाना मतदारसंघातून विनेश फोगट ४४३७ मतांनी आघाडीवर आहेत. बदली मतदारसंघातून ओमप्रकाश धनकर पिछाडीवर हरियाणातील बदली मतदारसंघातून भाजपचे ओमप्रकाश धनखर पिछाडीवर आहेत.