Haryana Election : “राहुल गांधींच्या विधानाचे आमच्याकडून स्वागत”; काँग्रेस-आप युतीवर ‘या’ बड्या नेत्याचं विधान चर्चेत, थेट म्हणाले….

Haryana Assembly Election 2024 – हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत युती व्हावी अशी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची इच्छा आहे. कॉंग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपला हा विचार मांडला असून पक्षाच्या अन्य नेत्यांचे यावर काय मत आहे अशी विचारणा केली आहे. तर आता काँग्रेसचे इरादे समोर आल्यानंतर ‘आप’कडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचं चित्र दिसून येत आहे.
खासदार संजय सिंह यांनी राहुल गांधींच्या प्रतिक्रियेचे स्वागत केले आहे. निश्चितपणे भाजपचा पराभव करणे हे युतीचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. आप नेत्याने महागाई, द्वेष आणि शेतकरी विरोधी धोरणांवर टीका केली. हरियाणाचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याशी बोलल्यानंतर काँग्रेससोबत युतीचा निर्णय अधिकृतपणे घेतला जाईल, असे संजय सिंह यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी हरियाणातील सर्व 90 जागांवर निवडणुकीची तयारी करत आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात संघटना मजबूत आहे. पुढील निर्णय हायकमांड घेईल. असं देखील त्यांनी सांगितलं.
काँग्रेस-आप युतीचा नेमका फायदा कुणाला, वाचा…
राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांची जबाबदारी केवळ सभागृहातच नाही तर बाहेरही विरोधी पक्षांना सोबत घेऊन जाण्याची आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार असल्याची चर्चा असताना, हरियाणातील सत्ताविरोधी लाटेला केजरीवाल यांच्यासोबत हाताळण्यासाठी काँग्रेसला एक चांगला पर्याय दिसत आहे.
इतर आघाड्यांना आम आदमी पक्षाला सोबत आणायचे आहे आणि तसे झाल्यास विरोधी मतांचे विखुरले जाऊ शकते आणि विजयी निकाल उलटू शकतो, असे काँग्रेसचे मत आहे.
केजरीवाल यांचा युवक, महिला आणि शहरी मतदारांच्या काही गटांवर चांगला प्रभाव आहे आणि हरियाणा हे केजरीवालांचे मूळ राज्यच नाही तर दिल्ली, ज्यात केजरीवाल मुख्यमंत्री आहेत, तिन्ही बाजूंनी हरियाणाला लागून आहे.
हा केवळ हरियाणाचा विषय नाही, तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाही पुढच्या वर्षी लवकर घ्यायच्या आहेत आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यास दिल्लीत युती करून भाजपला रोखण्याची रणनीती राहुल यांच्या मनात चालू असल्याची शक्यता आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल स्वत: प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. अशी एकूण स्थिती असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील मतांची विभागणी होण्याची शक्यता व भीती कॉंग्रेसला वाटते आहे.





