Haryana Election : “हा एक गेम आहे, अनेक जागांवर मतमोजणी थांबलीय…”; हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान

Haryana Election | Bhupinder Singh Hooda – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या ट्रेंडनुसार भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे, तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. एकूण 90 जागांपैकी भाजप सध्या 50 जागांवर आघाडीवर आहे.
मात्र चित्र अद्याप प्रलंबित आहे. कारण, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, 7 जागा अशा आहेत जिथे काँग्रेस खूपच कमी मतांनी मागे आहे. याचा अर्थ भविष्यात या जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना मते मिळाल्यास चित्र बदलू शकते.
मात्र, अश्यातच हरियानाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंग हुड्डा यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत मोठं विधान केलं आहे. भुपेंद्र म्हणाले, ‘अनेक ठिकाणी मतमोजणी थांबली आहे, अशी माहिती आहे. रोहतक शहरातली मतमोजणी थांबली आहे.
आम्हाला बहुमत मिळत आहे. हा एक गेम आहे. कधी चेंडू इकडे, तर कधी तिकडे, पण आम्हाला अंतिम निकालाची प्रतिक्षा करावी लागेल’. असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
#WATCH | Rohtak: Former CM and Congress candidate from Garhi Sampla-Kiloi, Bhupinder Singh Hooda says, “I have news that counting is stopped at several places. We are getting the majority…This is a game, the ball is sometimes here, sometimes there but we will do the final… pic.twitter.com/qs3b9ElRu1
— ANI (@ANI) October 8, 2024
चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ‘या’ 7 जागा….
* आदमपूर – काँग्रेस 1613 मतांनी मागे
* लोहारू- काँग्रेस २७२ मतांनी मागे
* रोहतक- काँग्रेस ८७९ मतांनी मागे
* उचाना कलां- काँग्रेस 221 मतांनी मागे
* महेंद्रगड- काँग्रेस 2547 मतांनी मागे
* असांध- काँग्रेस २१८६ मतांनी मागे
* होडल – काँग्रेस 2974 मतांनी पिछाडीवर
भाजप 50 जागांवर पुढे –
हरियाणात भाजपने 50 जागा मिळवून 46 चा बहुमताचा आकडा पार केला आहे आणि आघाडी कायम ठेवली आहे, तर काँग्रेस 35 वर आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ताज्या ट्रेंडनुसार, अपक्ष चार जागांवर आघाडीवर आहेत, तर इंडियन नॅशनल लोक दल (INLD) आणि बसपा प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.





