Harshwardhan Sapkal : मुंबई पोलिसांची हेरगिरी? हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

मुंबई : काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी सांगितले की, मुंबई पोलिस त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. साध्या वेशातील एक अधिकारी त्यांच्या निवासस्थानातील त्यांच्या खोलीत घुसल्याचा आरोप केला. पक्ष मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी दावा केला की, अलिकडच्या काळात ही तिसरी घटना आहे. एक पोलिस सर्वोदय आश्रमातील माझ्या बेडरूममध्ये घुसला आणि मी पत्रकार परिषद घेत आहे का आणि पत्रकार आले आहेत का?, याबद्दल मला विचारू लागला.
हे कोणी आदेश दिले आहेत असे मी विचारले असता, त्यांनी सांगितले की ते वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करत आहेत, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून ही पाळत ठेवली जात आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपचा विरोधकांवर प्रथम पेगासस, नंतर फोन टॅपिंग करण्याचा इतिहास आहे आणि आता ते आमच्या बेडरूममध्ये पोहोचले आहेत. परंतु अशा धमक्या आपल्याला थांबवू शकणार नाहीत, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दावा केला की, गावदेवी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सपकाळ यांच्या मुंबई भेटीदरम्यान त्यांच्या सर्वोदय आश्रमातील खोलीत घुसून त्यांना मीडियाची उपस्थिती आणि परिसरात सुरू असलेल्या कारवायांबद्दल विचारपूस केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा शहर पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशाने हेरगिरी केली जात आहे का?, असे लोंढे यांनी विचारले.
पोलिस कर्मचाऱ्यांनी सपकाळ यांना ओळखले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या राजवटीत हेरगिरी झाली होती, असे सांगत महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आमचा एकमेव अजेंडा राज्याचा आणि लोकांचा विकास आहे. कोणावरही हेरगिरी करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही,असे बावनकुळे म्हणाले.





