Harshvardhan Sapkal : टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणे भोवलं; हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
Harshvardhan Sapkal : पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे कार्य समकक्ष आहे,” असे खळबळजनक वक्तव्य केले असून, यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
याप्रकरणी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्याने टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं भोवल्याचं दिसत आहे. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे आणि दंगल निर्माण होईल अशी परिस्थिती करणारे वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Harshvardhan Sapkal
काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या शौर्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचा विचार मांडला आणि शौर्य गाजवले, त्यांचाच आदर्श घेऊन बऱ्याच काळानंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे या मातीचे पुत्र होते आणि त्यांनी कधीही विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यांच्या शौर्याचा विचार करता, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे.” Harshvardhan Sapkal
हेही वाचा :






