“पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून माने यांनी विजयाचा दिवा लावला” ; हर्षवर्धन पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Harshvardhan Patil on Ichalkaranji । भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे सध्या त्यांच्या एका वक्तव्याने वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी आपल्या एका भाषणात इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना चक्क पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी थेट तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तीने घेरलं होतं Harshvardhan Patil on Ichalkaranji ।
वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी धैर्यशील माने यांच्याविषयी बोलताना “आजूबाजूला सर्व अदृश्य शक्तींनी धैर्यशील मानेंना घेतला असताना देखील त्यांनी दिवा लावला, असे वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं.
वादळात देखील धैर्यशील माने यांनी दिवा लावला Harshvardhan Patil on Ichalkaranji ।
पुढे बोलताना पाटील यांनी “खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तीने घेरलं होतं. अदृश्य शक्तीने घेतल असताना देखील पाक व्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजी मधून धैर्यशील माने यांनी वादळात देखील दिवा लावला. इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अज्ञात शक्तीने घेरले होते. तरीदेखील या वादळात देखील धैर्यशील माने यांनी दिवा लावून विजय मिळवला, असे वक्तव्य केले.
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते. परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या. त्यांची नावे घेतली तर अवघड होईल. परंतु होता जीवा म्हणून वाचला शिवा असे सांगत धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचे सहकार्य झाल्याचे स्पष्टोक्ती दिली. परंतु भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इचलकरंजीला पाक व्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने त्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
हेही वाचा
नाना पटोलेंच्या गळ्यात ‘भावी मुख्यमंत्री’ लिहिलेली वीणा ; भुजबळ-पवार यांच्या भेटीवर केले परखड भाष्य





