Nagar | भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हा प्रमुखपदी हरिदास पुंड
Updated On:

घोडेगाव, (वार्ताहर): भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हा प्रमुखपदी शिंगवे तुकाई (ता. नेवासा) येथील सामाजिक कार्यकर्ते हरिदास रामभाऊ पुंड यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष अरुणराव निटूरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल बाळासाहेब गाडेकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उद्धव होंडे यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सौरभ बाळासाहेब पवार यांची नेवासा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हरिदास पुंड यांनी सांगितले की, भ्रष्टाचार निर्मूलन समिती (पर्यावरण समिती) महाराष्ट्र राज्य यांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, ती मी योग्यरीत्या पार पाडीन. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.





