Purva Walse Patil : श्री संत सावता महाराज पतसंस्थेचा आदर्श घ्या – पूर्वा वळसे पाटील यांचे आवाहन

प्रभात वृत्तसेवा
मंचर – घोडेगाव येथील श्री संत सावता महाराज पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेले कन्या दत्तक पालक योजना हे खूप मोठे कार्य आहे.गरीब मुलींच्या शिक्षणासाठी सहाय्य करून त्यांना उभं केलं जाते. इतर संस्थांनी श्री संत सावता महाराज पतसंस्थेचा आदर्श घ्यावा.असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेच्या संचालिका पूर्वा वळसे पाटील यांनी केले.घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेअंतर्गत १०१ मुली दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेच्या संचालिका पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
त्याप्रसंगी पूर्वा वळसे पाटील बोलत होत्या. कार्यक्रम प्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर,घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे, सामाजिक कार्यकर्ता शशिकला काळे,ग्रामपंचायत सदस्य संगीता भागवत,बी,डी,काळे महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, पतसंस्थेचे संचालक कैलास सोमवंशी, गोविंद घोडेकर, सुनील आकले ,स्वप्निल भास्कर, दत्ता वऱ्हाडी, नर्मदे हर परिवाराचे संस्थापक विनोद काळे , माजी प्राचार्य लक्ष्मण काळे,मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर संस्थेचे सल्लागार लालचंद गुप्ता ,विठ्ठल महाराज करवंदे, किसन महाराज भास्कर, अभिजीत कुदळे ,नितीन बारवे, दौंड भाऊसाहेब, प्राचार्य कळंबे यांच्या सह संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच संस्थेचा सभासद वर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी केले.





