Hardik Tirupati Visit : कपाळावर टिळा, अंगात कुर्ता अन् मुंडण! हार्दिकने पुनरागमनापूर्वी माहिकासह तिरुपती बालाजीचे घेतले दर्शन, पाहा VIDEO
Hardik Tirupati Visit : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या रविवारी सकाळी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील प्रसिद्ध भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,

Hardik Pandya Mahieka Sharma Tirupati Balaji Temple Suprabhatam Seva Video Viral : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) रविवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील प्रसिद्ध भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी (Tirupati Balaji Temple) मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. यावेळी हार्दिक एकटा नसून, त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा (Mahieka Sharma) देखील त्याच्यासोबत उपस्थित होती. या दर्शनादरम्यान हार्दिकचा पूर्णपणे बदललेला लूक (New Look) समोर आला असून, सोशल मीडियावर त्याच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा सुरू आहे.
पारंपरिक वेशभूषा आणि मुंडण केलेला लूक व्हायरल!
नेहमी आपल्या स्टायलिश लूकसाठी चर्चेत असणाऱ्या हार्दिक पंड्याने या देवदर्शनासाठी चक्क आपले मुंडण (Head Shaved) केले होते. कपाळावर मोठा टिळा आणि पारंपरिक पांढरा कुर्ता-पायजामा अशा साध्या वेशात तो मंदिरात पोहोचला. हार्दिक आणि माहिका शर्मा यांनी पहाटे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध ‘सुप्रभातम सेवा’ (Suprabhatam Seva) पूजेत सहभाग घेतला आणि भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले. या दोघांचा मंदिरातील दर्शनाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. आयपीएल २०२६ चा हंगाम संपल्यापासून हार्दिक अद्याप मैदानावर पुनरागमन करू शकलेला नाही.
VIDEO | Tirupati, Andhra Pradesh: Indian cricketer Hardik Pandya offers prayers during the Suprabhata Seva at the Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/HKdtPmcyC3
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2026
सप्टेंबरमधील पुनरागमनावर सर्वांच्या नजरा –
Indian cricketer Hardik Pandya visited the Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala today with Mahika Sharma.
Hardik offered his hair as part of a religious vow and was seen in a new bald look. The two also took part in the early morning Suprabhatha Seva. 🙏 pic.twitter.com/mdkQlecKLv
— Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) August 2, 2026
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या (2027 ODI World Cup) पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या रणनीतीमध्ये हार्दिक पंड्या हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे तो मागील काही मालिकांमध्ये खेळू शकलेला नाही. हार्दिकने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्याच्या रूपाने खेळला होता. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो शेवटचा २०२५ च्या सुरुवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरला होता.
आता तो तंदुरुस्ती चाचणी (Fitness Test) उत्तीर्ण करून सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून (September Series) पुनरागमन करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.





