Bumrah Injury Shock : श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह कसोटी मालिकेतून बाहेर?
Jasprit Bumrah Injury : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jasprit Bumrah Injury Update IND vs SL Test Series WTC Points Table : टी-२० क्रिकेटचा थरार संपल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष आगामी कसोटी मालिकेवर लागले आहे. भारतीय संघ लवकरच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर होऊ शकतो.
डाव्या गुडघ्याची दुखापत ठरतेय डोकेदुखी!
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने (BCCI Medical Team) त्याला इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. बुमराहने गेल्या महिन्यात इंजेक्शन घेतले होते, परंतु तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही.
Jasprit Bumrah ruled out of the Test series against Sri Lanka. (TOI). pic.twitter.com/TgmQFZpgEI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 2, 2026
श्रीलंका दौऱ्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याचे खेळणे फिटनेसवर अवलंबून होते. आता आगामी न्यूझीलंड दौरा लक्षात घेता, संघ व्यवस्थापन बुमराहच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
डब्ल्यूटीसी फायनलच्या दृष्टीने मालिकेचे महत्त्व –
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे फायनल गाठण्याच्या दृष्टीने भारतासाठी श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. अशा महत्त्वाच्या वळणावर बुमराहचे संघात नसणे हा कर्णधार शुबमन गिलसाठी मोठा चिंतेचा विषय ठरणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.





