Hardik Pandya Engagement : हार्दिक-माहिकाने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

Hardik Pandya engagement with Mahieka Sharma rumors : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याची वैयक्तिक आयुष्यातील नवी इनिंग. मॉडेल माहिका शर्मासोबतच्या त्याच्या जवळीकतेमुळे दोघांच्या रिलेशनच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता दोघांनी साखरपुडा केल्याचेही कयास लावले जात आहेत. याचे कारण काय आहे? जाणून घेऊया.
माहिका शर्माच्या हातातील एका चमचमत्या डायमंड रिंगमुळे चाहत्यांनी ही चर्चा सुरू केली आहे. नुकताच सोशल मीडियावर हार्दिकचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात माहिका त्याला ड्रिंक देत आहे. याचवेळी तिच्या डाव्या हाताच्या बोटात ती डायमंड रिंग स्पष्टपणे दिसत आहे.
Cricketer Hardik Pandya and actor-model Mahieka Sharma have been treating fans to a steady stream of PDA on social media. Recently, Hardik shared a carousel of their special moments, including a puja they performed together. What immediately caught everyone’s eye, however, was th pic.twitter.com/Myx4PoqLFb
— Buzzzooka Scrolls (@Buzzz_scrolls) November 20, 2025
नताशा स्टॅनकोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पंड्या सातत्याने माहिका शर्मासोबत दिसू लागला आहे. दोघांना पहिल्यांदा मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यानंतर हार्दिकच्या वाढदिवसापूर्वी दोघे विदेशात ट्रिपवरही गेले होते. दिवाळीची पूजा असो किंवा फॅमिली फोटोशूट, प्रत्येक ठिकाणी माहिका हार्दिकच्या सोबत दिसली आहे. यावरून हार्दिक पुन्हा एकदा प्रेमाच्या ‘पिच’वर क्लीन बोल्ड झाला आहे, असं चाहत्यांना वाटत आहे.
अधिकृत घोषणा नाही –
सोशल मीडियावर चाहते उत्साहाने साखरपुड्याचा दावा करत असले तरी, हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दैनिक प्रभातदेखील या बातमीची पुष्टी करत नाही. यापूर्वी हार्दिकने २०२० मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले होते, पण गेल्या वर्षी जुलैमध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगाही आहे.
हार्दिक क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यास उत्सुक –
वैयक्तिक आयुष्यातील या चर्चांमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक लवकरच क्रिकेटच्या मैदानातही दिसेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत तो खेळताना दिसू शकतो, तर एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.





