सध्या बांगलादेशचा संघ राजधानी ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये आयर्लंडविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या एका खेळाडूने इतिहास रचला आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हि कामगिरी करणारा तो बांगलादेशचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. मुशफिकुर रहीमने रचला इतिहास आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळल्यानंतर मुशफिकुर रहीमने १०० कसोटी सामने पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. याआधी,कोणताही बांगलादेशी खेळाडू १०० कसोटी सामन्याच्या जवळपासदेखील पोहोचले नव्हते. रहीमनंतर मोमिनुल हक हा सर्वाधिक १०० कसोटी सामने खेळणारा बांगलादेशी क्रिकेटपटू आहे. हकने ७५ कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. 🚨 HISTORY BY MUSHFIQUR RAHIM 🚨 – He becomes the first Bangladesh Cricketer to complete 100 Tests. 👏 pic.twitter.com/9BRB4cLhsg — Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2025 सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले बांगलादेशी क्रिकेटपटू मुशफिकर रहीम – १०० सामने मोमिनुल हक – ७५ सामने शाकिब अल हसन – ७१ सामने तमीम इक्बाल – ७० सामने मोहम्मद अश्रफुल – ६१ सामने रहीमचा खास सत्कार दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी कर्णधार हबीबुल बशर यांनी मुशफिकुर रहीमला एक खास कसोटी कॅप दिली. माजी कर्णधार अक्रम खान यांनीही रहीमला स्मृतिचिन्ह प्रदान केलं. यानंतर, कर्णधार नझमुल हुसेन शांतोने रहीमला दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूंच्या स्वाक्षरी केलेल्या जर्सी भेट दिल्या.या ऐतिहासिक प्रसंगी, रहीमने त्याच्या कुटुंबाचे, पत्नीचे, त्याचे सहकारी, प्रशिक्षक, त्याचा मित्रपरिवार आणि त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.