IND vs SA : हार्दिक पंड्याची हार्ड-हिटिंग! टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलं अनोखं शतक

IND vs SA Hardik Pandya Complete 100 Sixes in T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला कटक येथे सुरुवात झाली आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या हार्ड-हिटींग फटकेबाजीच्या जोरावर १७५ धावांचा डोंगर उभारला. हार्दिक पंड्याने २८ चेंडूंत ५९ धावांची वादळी खेळी साकारत एक अनोखं शतकही पूर्ण केलं आहे. याबाबतीत त्याने केएल राहुलला मागे टाकले आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारतीय संघाने अवघ्या ४८ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पंड्याने संघाचा डाव चांगल्या प्रकारे सावरला. त्याने २८ चेंडूचा सामना करताना सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ५९ धावांची खेळी साकारली आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक खास टप्पा पार केला.
हार्दिक पंड्याने झळकावलं अनोखं शतक –
Hardik Pandya brings up 1️⃣0️⃣0️⃣ T20I sixes! 💙
The cleanest striker in the business continues to rise. ⚡🚀#INDvSA #HardikPandya #Sportskeeda pic.twitter.com/5pCXXG1LSS
— Sportskeeda (@Sportskeeda) December 9, 2025
हार्दिक पंड्याने या खेळीत चार षटकार ठोकत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले. यासह तो भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा चौथा खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम करताना त्याने केएल राहुलला मागे टाकले, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९६ षटकार मारले आहेत. तसेच हार्दिकने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले सहावे अर्धशतक झळकावले.
हेही वाचा – IND vs SA : लुंगी एनगिडीचा कहर! गिल-सूर्या-अभिषेक स्वस्तात माघारी, टीम इंडियाचा डाव अडचणीत
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
- २०५ – रोहित शर्मा
- १५५ – सूर्यकुमार यादव
- १२४ – विराट कोहली
- १०० – हार्दिक पंड्या
- ९९ – केएल राहुल
हार्दिक पंड्याची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने १२१ सामन्यांमधील १०८ डावांमध्ये गोलंदाजी करताना २६.५८ च्या सरासरीने आणि ८.२२ च्या इकॉनॉमी रेटने १०० विकेट्स मिळवले आहेत. गोलंदाजीतील त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन १६ धावा देऊन ४ विकेट्अस से आहे. फलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने ९५ डावांमध्ये फलंदाजी करत १४१.०१ च्या दमदार स्ट्राइक रेटने १९१९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ६ अर्धशतके ठोकली असून, त्याची सर्वाधिक धावसंख्या ७१ धावा आहे.





