Hardik Pandya Captaincy Record : हार्दिक पंड्याचा कर्णधार म्हणून IPL मध्ये गुजरात-मुंबईसाठी कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या
Hardik Pandya Captaincy Record : गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून देणारा हार्दिक मुंबईच्या निळ्या जर्सीत मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.

Hardik Pandya Captaincy Record MI vs GT : आयपीएल २०२६ ( IPL 2026) च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा (MI) संघर्ष सुरू असतानाच, कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून देणारा हार्दिक मुंबईच्या निळ्या जर्सीत मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.
हार्दिक पांड्याला २०२४ च्या हंगामापूर्वी एका मोठ्या वादात मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. गुजरात टायटन्सला (GT) सलग दोनदा फायनलमध्ये नेणाऱ्या हार्दिककडून मुंबईला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईसाठी हार्दिकची कप्तानी ‘अनलकी’ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. (Hardik Pandya Captaincy Record)
मुंबई इंडियन्स: विजयाची टक्केवारी निम्म्याहून कमी
The Western Derby is here 💙
Who is walking away with the bragging rights tonight? 🗣️#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @gujarat_titans | @mipaltan pic.twitter.com/MfOBbDoQk6
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
२०२४ पासून आतापर्यंत हार्दिकने मुंबई इंडियन्ससाठी ३३ सामन्यांत कप्तानी केली आहे. यापैकी केवळ १४ सामन्यांत त्याला विजय मिळवता आला, तर १९ सामन्यांत पराभवाचा धक्का बसला आहे. मुंबईचा कर्णधार म्हणून त्याची विजयाची टक्केवारी अवघी ४२.४% आहे. चालू हंगामातही (IPL 2026) मुंबईने पाच पैकी चार सामने गमावले असून संघ गुणतालिकेत तळाला आहे.
गुजरात टायटन्स: हार्दिकचा सुवर्ण काळ (Hardik Pandya Captaincy Record)
हार्दिकच्या कप्तानीचा खरा जलवा गुजरात टायटन्समध्ये पाहायला मिळाला होता. २०२२ आणि २०२३ च्या हंगामात मिळून त्याने ३१ सामन्यांत नेतृत्व केले, ज्यापैकी २२ सामन्यांत संघाने विजय मिळवला. गुजरातसाठी त्याची विजयाची टक्केवारी ७१% इतकी प्रचंड होती. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच वर्षी (२०२२) राजस्थान रॉयल्सला हरवून जेतेपद पटकावले होते, तर २०२३ मध्ये संघ उपविजेता ठरला होता.
दोन्ही संघांमधील हार्दिकच्या कामगिरीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंशी असलेला ताळमेळ आणि मैदानातील निर्णय यांमुळे हार्दिक सध्या चाहत्यांच्या आणि टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. (Hardik Pandya Captaincy Record)





