Vaibhav Sooryavanshi Emotional : राजस्थानच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी भावुक! सामन्यानंतर एका कोपऱ्यात बसल्याचा VIDEO व्हायरल
Vaibhav Sooryavanshi Emotional : केकेआरविरुद्धच्या सामना राजस्थान रॉयल्सचा दुसरा पराभव झाल्याने वैभव सूर्यवंशी भावुक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi Emotional Video Viral : आयपीएल २०२६ ( IPL2026) च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या विजयरथाला ब्रेक लागला असून, सलग दोन पराभवांमुळे संघातील खेळाडू कमालीचे भावूक झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) पराभवानंतर राजस्थानचा १५ वर्षीय युवा स्टार वैभव सूर्यवंशी याचा एक भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशी पराभवानंतर भावुक – (Vaibhav Sooryavanshi Emotional)
ईडन गार्डन्सवर झालेल्या चुरशीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा २ चेंडू आणि ४ गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थानकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने ४६ धावांची स्फोटक खेळी केली होती, मात्र संघाचा पराभव तो टाळू शकला नाही. सामन्यानंतर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये वैभव बाऊंड्री लाईनवर पाठमोरा एकटाच बसलेला दिसत आहे. तो अत्यंत हताश आणि निराश दिसत असून, काही सहकाऱ्यांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. नेटकऱ्यांच्या दाव्यानुसार, पराभवाच्या दुःखामुळे वैभवला अश्रू अनावर झाले होते.
🔴VAIBHAV SURYAVANSHI SEEN CRYING AFTER LOSS AGAINST💔
– He did everything he could to help his team win at just 15 years old 🥹 pic.twitter.com/lKvSjlk2mD
— Sam (@Cricsam01) April 20, 2026
ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आणि पदरी निराशा –
आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी एका कार्यक्रमात वैभवने त्याचे ध्येय स्पष्ट केले होते. “मला राजस्थान रॉयल्ससाठी यंदाची ट्रॉफी जिंकायची आहे,” अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती. राजस्थानने हंगामाची सुरुवात दिमाखात केली होती, मात्र आधी हैदराबाद (SRH) आणि आता कोलकाता यांच्याकडून मिळालेल्या सलग दोन पराभवांमुळे वैभव मनातून खचल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या स्वप्नापासून संघ दूर जात असल्याची भीती कदाचित या युवा खेळाडूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ( Vaibhav Sooryavanshi Emotional)
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १५५ धावा केल्या होत्या. वरुण चक्रवर्तीने १४ धावांत ३ वितेट्स घेत राजस्थानच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने शेवटच्या षटकात थरारक विजय मिळवला. वैभवने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार मारले होते, पण त्याची ही मेहनत विजयासाठी पुरेशी ठरली नाही. सलग दोन पराभवांमुळे राजस्थानच्या गुणतालिकेतील स्थानावरही परिणाम झाला असून, आता संघाला पुनरागमनासाठी संघर्ष करावा लागणार आहे. (Vaibhav Sooryavanshi Emotional)





