nagar | ट्रॅक्टर घेण्यासाठी विवाहितेचा छळ

नगर, (प्रतिनिधी) – ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळ कोयाळ पिंपळा (ता. आष्टी, जि. बीड) येथील रहिवाशी व सध्या दशमी गव्हाण (ता. नगर) येथे राहत असलेल्या पीडित विवाहितेने या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासू अलका धोंडीभाऊ बनकर, पती अक्षय धोंडीभाऊ बनकर, सासरे धोंडीभाऊ बनकर (सर्व रा. कोयाळ पिंपळा), ननंद कोमल मनोहर लबडे, ननंदेची सासु छाया सुदाम लबडे, सासरे सुदाम विठ्ठल लबडे, नदांवा मनोहर सुदाम लबडे (सर्व रा. भातोडी पारगाव ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सदरची घटना जून २०२३ रोजी सकाळी १० ते १८ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान कोयाळ पिंपळा येथे घडली असून ४ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सासरी कोयाळ पिंपळा येथे नांदत असताना त्यांच्या पतीसह सात जणांनी त्यांना ‘तुझ्या आई वडिलांकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे घेऊन ये’ असे म्हणून वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.
वेळोवेळी उपाशीपोटी ठेऊन त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने ४ जुलै रोजी सायंकाळी नगर तालुका पोलीस ठण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार भवार करत आहेत.





