पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 69 वर्षांचे झाले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण पंतप्रधानांना शुभेच्छा देत आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनीही ट्‌विटरवरून त्यांचे अभिनंदन केले. अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त भाजप नेत्यांनीही ट्‌विटरवरून पंतप्रधानांचे अभिनंदन केले. तसेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या.

अमित शहा यांनी ट्‌विट करून लिहिले आहे की, ‘देशाचे सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमाचे प्रतीक. तुमच्या नेतृत्वात उदयास येणाऱ्या एका नवीन भारताने एक बलवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह राष्ट्र म्हणून जगात एक ठसा उमटविला आहे.’ केंद्रीय गृहमंत्र्यांनी लिहिले की, ‘विकासाबरोबरच भारतीय संस्कृतीला समृद्ध करण्यासाठी मोदीजींचे अभूतपूर्व योगदान आहे. सुधारक म्हणून मोदींनी केवळ राजकारणाला नवी दिशाच दिली नाही तर आर्थिक सुधारणांसह अनेक दशकांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा शोधून सर्वांनाच अभिमान वाटला.’

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही ट्‌विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. परराष्ट्रमंत्र्यांनी लिहिले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात नवीन भारत तयार होत आहे, जो प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल ट्‌विटरवरून अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, पीएम मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे नाव जगभरात प्रकाशित झाले आहे आणि त्यांनी भारताला विकासाच्या मार्गावर नेले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही ट्‌विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्‌विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, तुमच्या नेतृत्वात भारताला जागतिक गुरु बनवण्याचे उद्दिष्ट आपण पूर्ण केले पाहिजे, अशा इच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या व्हिडिओला भाजपने ट्‌विट केले आहे.

यूपीएच्या अध्यक्षा आणि कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी ट्‌विटरवर शुभेच्छा व्यक्त करत लिहिले की, विकासपुरुष, नवभारताचे शिल्पकार आमचे नेते मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या संपूर्ण महाराष्ट्रातर्फे कोटी कोटी शुभेच्छा !

Leave A Reply

Your email address will not be published.