Jamkhed News : पिंपळगाव उंडा येथे २२५ विद्यार्थ्यांना ‘हनुमान चालीसा’चे वाटप! श्री चन्नप्पा महाराज पुण्यतिथीनिमित्त उपक्रम
Jamkhed News : जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे श्री चन्नप्पा महाराज संजीवन समाधी पुण्यतिथी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले.

Jamkhed News : पिंपळगाव उंडा येथील श्री चन्नप्पा महाराज संजीवन समाधी पुण्यतिथी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. (Jamkhed News)
श्री चन्नप्पा महाराज माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २२५ विद्यार्थ्यांना ‘रोहित दादा पवार मित्र मंडळ’ व ‘मैत्री ग्रुप’च्या वतीने हनुमान चालीसा वाटप करण्यात आले. आमदारांचे समर्थक सागर गवसने मराठा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. (Jamkhed News)
विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक व नैतिक संस्कार रुजवावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता श्री चन्नप्पा महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून गवसने परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही लघुरुद्र अभिषेक व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. (Jamkhed News)
अरणगावचे पूज्य शिवानंद स्वामी यांच्यासह १३ स्वामींच्या उपस्थितीत वेदोक्त मंत्रोच्चारात हा पूजाविधी अत्यंत थाटात पार पडला. मान्यवरांची उपस्थिती व सत्कार सोहळा या धार्मिक व सामाजिक सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. (Jamkhed News)
यावेळी मुख्याध्यापक श्री मुकुंदराज सातपुते, सहशिक्षक अविनाश नवसरे, जनार्दन आजबे, गौतम ओमासे, शिवराज जाधव, इथापे सर व गाडेकर सर. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सरपंच प्रकाश गोलेकर, तात्या जाधव, शहाजी बोलभट्ट आप्पा आंधळकर, सिदलिंग आंधळकर, दीपक आंधळकर, विजय गव्हाणे, शशिकांत ढगे व नवनाथ जाधव. निवृत्त नेव्ही अधिकारी विठ्ठल गवसने, निवृत्त पीएसआय अमरनाथ गवसने, गणेश गवसने, सागर गवसने आणि सुरज गवसने यांच्यासह सदर कार्यक्रमास ग्रामस्थ, भाविक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली असून या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. (Jamkhed News)





