Hangzhou Open 2024 : भारताच्या जीवन-विजय जोडीनं पटकावलं विजेतेपद…

Hangzhou Open 2024 (Jeevan Nedunchezhiyan-Vijay Sundar Prashanth) :- भारताच्या जीवन नेदुंचेझियान आणि त्याचा जोडीदार विजय सुंदर प्रशांत यांनी मंगळवारी हांगझो ओपन चॅम्पियन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांनी जर्मनीच्या कॉन्स्टँटिन फ्रँटझेन आणि हेंड्रिक जेबेन्स जोडीला पराभूत करताना ही कामगिरी बजावली.
ATP 250 Hangzhou Open:
The Doubles Champions 🏆 –
🇮🇳 Vijay Sundar Prashanth & 🇮🇳 Jeevan Nedunchezhiyan 🙌📸: ATP Tour / @HangzhouOpen pic.twitter.com/tcbtAxU8og
— Indian Tennis Daily (ITD) (@IndTennisDaily) September 24, 2024
अंतिम लढतीत जीवन – विजय सुंदर यांच्या जोडीने फ्रँटझेन – जेबेन्स यांच्या बिगरमानांकीत जोडीला 4-6, 7-6(5), 10-7 असे पराभूत केले. सुरुवातीचा सेट 4-6 असा गमावल्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन करत दुसरा सेट 7-6 असा जिंकून सामना टायब्रेकपर्यंत नेला.
टायब्रेकमध्ये भारतीय जोडी 10-7 अशी पुढे होती. जीवन आणि विजय या जोडीने त्यांच्या सर्व्हिसवर गुणांचे रूपांतर केले. 35 वर्षांच्या जीवनचे दुसरे एटीपी टूर स्तरावरील विजेतेपद आहे. यापूर्वी रोहन बोपण्णा व जीवन यांच्या जोडीने 2017 मध्ये विजेतेपद मिळविले होते.





