Hai Jawani To Ishq Hona Hai Movie : वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “है जवानी तो इश्क होना है” या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ५ जून २०२६ रोजी होणार होता. परंतु निर्मात्यांनी आता नवीन रिलीज डेटची घोषणा केली आहे. त्यामुळे हा चित्रपट एका आठवड्यानंतर म्हणजेच १२ जून रोजी रिलीज होणार आहे. साऊथ स्टार यशच्या टॉक्सिक या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आल्यामुळे निर्माते रमेश तौरानी आणि चित्रपटाची टीम नाराज असल्याचा दावा अलिकडेच करण्यात आला आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित टॉक्सिकची रिलीज डेट १९ मार्च होती, पण धुरंधर २ सोबत क्लॅश करण्यास निर्मात्यांनी फारकत घेत टॅाक्सिकची रिलीज डेट ४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. टिप्स फिल्म्सचे व्यवस्थापकीय संचालक रमेश तौरानी यांनी “है जवानी तो इश्क होना है” या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. यशच्या टॉक्सिक चित्रपटाचे नाव घेतले नसले तरी, या चित्रपटामुळे “है जवानी तो इश्क होना है” चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. रमेश तौरानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की आमचा चित्रपट है जवानी तो इश्क होना है ५ जून रोजी प्रदर्शित होणार होता, ही तारीख आम्ही काही महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता आमचा चित्रपट पुढे ढकलणे अधिक योग्य ठरेल असे आम्हाला वाटले.” Hai Jawani Toh Ishq Hona Haते पुढे म्हणतात, “आमचा असा ठाम विश्वास आहे की चित्रपट निर्माते एकाच तारखांवर अनावश्यक स्पर्धा करण्याऐवजी एकमेकांना पाठिंबा देतात तेव्हा ते नेहमीच उद्योगासाठी चांगले असते. या एकतेच्या भावनेने, आम्ही ‘है जवानी तो इश्क होना है’ चे प्रदर्शन १२ जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा आणि आमचा चित्रपट एका आठवड्यानंतर प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.” जीएफ २ च्या जबरदस्त यशानंतर चार वर्षांनी यश टॉक्सिक चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. १९ मार्च हा चित्रपट धुरंधर २ सोबत टक्कर देणार होता. तेव्हा केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील भारतीय चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह होता. परंतु अचानक ‘टॉक्सिक’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले की मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटामुळे ते १९ मार्चऐवजी ४ जून रोजी चित्रपट प्रदर्शित करतील. या बदलामुळे २०२६ मधील सर्वात मोठ्या बिग बजेट चित्रपटाची कॅल्श टळली आहे. हेही वाचा : India Bangladesh diesel supply: राजा झाला उदार ! देशात तेलसंकट असताना भारत बांगलादेशला पाठवणार ‘इतके’ टन इंधन ; नेमकं कारण काय? वाचा