‘केजीएफ चॅप्टर-2’चे हैदराबादमध्ये होणार शूटिंग

केजीएफच्या यशानंतर सुपरस्टार यशचे चाहते “केजीएफ चॅप्टर 2’ची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यशने आपल्या चित्रपटाचा ब्रॅंड तयार केला असून सर्व चाहत्यांना तो आवडतो. सध्या चित्रपटाचे निर्माता शूटिंग पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 

यापूर्वी संजय दत्त त्याच्या शूटचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी हैदराबादला गेला असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता यशदेखील चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील शूटिंगसाठी तयार आहे. या चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण करण्यासाठी यश हैदराबादला जाणार आहे. हे शूटिंग डिसेंबरच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे. 

“केजीएफ चॅप्टर 2’साठी प्रत्येकजण उत्सुक आहे. कारण केजीएफ 2 तयार होण्यास बराच वेळ घेतला असून करोनामुळे दीर्घकाळ रखडल्यानंतर आता चित्रपट पूर्णत्वाच्या जवळ आहे. दरम्यान, “केजीएफ’मधील यशच्या प्रभावी अभिनयाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती. यामुळे या चित्रपटाच्या सिक्‍वलची सर्वांना प्रतीक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.