‘है जवानी तो इश्क होना है’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण; वरुण धवन लवकरच बॅार्डर 2 वर लक्ष केंद्रीत करणार

अभिनेता वरुण धवनकडे सध्या अनेक सिनेमे आहेत. तो ‘सनी संस्कारी तुलसी कुमारी’मध्ये दिसणार आहे. वरुण सनी देओलच्या मल्टीस्टारर ‘बॉर्डर 2’ मध्ये एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो ‘है जवानी तो इश्क होना है’ या रोमँटिक कॉमेडी सिनेमातही झळकणार आहे. त्याचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.
रिपोर्ट्सनुसार, वरुण धवनने गोव्यात सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले असून तो आता डेहराडूनला रवाना झाला आहे. डेहराडूनचे शेड्यूल पूर्ण करून वरुण धवन आणि डेव्हिड धवन शूटिंगसाठी लंडनला रवाना होतील, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. वरुणसोबत या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे.
आता वरुण ‘बॉर्डर 2’वर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याने ‘है जवानी तो इश्क होना है’चे शूटिंग सुरू केले आहे. मीडिया रिपोट्सनुसार, वरुण या सिनेमाच्या शेवटेचे स्केड्युल आठवड्याच्या शेवटी डेहराडूनमध्ये पूर्ण करणार आहे. ‘बॉर्डर 2’ आणि ‘है जवानी तो इश्क होना है’ या दोन्ही सिनेमांमध्ये वरुण धवन दोन वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे.
एका सिनेमात तो मिशीसोबतच्या लूकमध्ये दिसणार आहे, तर दुसऱ्या सिनेमात क्लीन शेव्ह लूकमध्ये तो दिसणार आहे. त्याच्या या दोन्ही लूकची बरीच चर्चा देखील केली जात आहे. अशा परिस्थितीत ‘बॉर्डर 2’ च्या शूटिंगपूर्वी त्याला या रोमँटिक कॉमेडी सिनेमाचे काम पूर्ण करायचे आहे. या सिनेमात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडेही दिसणार आहेत.





