Varun Dhawan : वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला 6 महिन्यांच्या लेकीचा फोटो

बॉलीवूड सेलिब्रिटी ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने पहिल्यांदाच त्याच्या सहा महिन्यांच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल जून २०२४ मध्ये आई-बाबा झाले. त्यांनी ३ जून रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांना मुलगी झाली. त्यांच्या मुलीचं नाव लारा आहे.
नताशा किंवा वरुणने मुलीचा फोटो आतापर्यंत शेअर केला नव्हता. ख्रिसमसच्या निमित्तानं पहिल्यांदाच त्यांनी लाराबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ‘मी विथ माय बेबीज. मेरी ख्रिसमस’ असं कॅप्शन देत वरुणनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
या फोटोमध्ये तो व त्याची पत्नी नताशा दोघेही पोज देत आहे. नताशाने लाराला जवळ घेतलं आहे, तर वरुण त्याच्या पाळीव श्वानाला घेऊन बसला आहे. लाराने चेक्सचा फ्रॉक घातला आहे, पण तिचा चेहरा दिसत नाही. त्यांनी तिच्या चेहऱ्यावर लाल रंगाचा हार्ट इमोजी लावला आहे. वरुणनने शेअर केलेला हा फॅमिली फोटो खूपच चर्चेत आहे.





