Vaishnavi Hagavane Death Case: “हगवणे कुटुंबाचा….”; NCP ची पहिली प्रतिक्रिया, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय म्हणाले पाहा…

Sunil Tatkare : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवनवे खुलास होत असून वैष्णवीच्या आई वडिलांकडून सासच्या लोकांनावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पोलिस वैष्णवीचे सासरे आणि दीरचा शोध घेत आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हगवणे कुटुंबाचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी याविषयी एका वाहिन्याला प्रतक्रिया दिली आहे.
२०२३ मध्ये वैष्णवी आणि शशांक यांचा मोठ्या थाटात शाही विवाह सोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुलीच्या घरच्यांनी जावायला फॅार्च्युनर गाडीची चावी अजित पवारांच्या हातात दिल्याचे फोटो समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांकडून हगवणेविरुद्ध कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केले जात आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव सातत्याने समोर येत आहेत. यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाले तटकरे?
मुळशीच्या हगवणे कुटुंबाचा राष्ट्रवादीशी सध्या कोणताही संबंध नाही. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नियुक्त नव्हते, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत. या प्रकरणात वैष्णवीचा सासरच्या लोकांनी छळ केला असल्याचा आरोप देखील होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून वैष्णवीचा साससा आणि दीर फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे चार पथक तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.





