जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या ; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

H. B. P. Shirish Maharaj More suicide । जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे.
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या H. B. P. Shirish Maharaj More suicide ।
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते.
२० फेब्रुवारीला होता विवाहसोहळा H. B. P. Shirish Maharaj More suicide ।
शिरीष महाराज मोरे यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. २० फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.





