Gyanvapi masjid case : ज्ञानव्यापी प्रकरणी पुरातत्व विभागाला 10 दिवसांची मुदतवाढ

Gyanvapi masjid case – उत्तर प्रदेशातील ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी वाराणसी येथील न्यायालयाने पुरातत्व विभागाला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पुरातत्व विभागाकडून ज्ञानव्यापी मशिदीचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्वेक्षण केले जाऊन त्याच्या आधारे अहवाल न्यायालयाला सादर करणे अपेक्षित आहे.
पुरातत्व विभागाला यापूर्वी 17 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र शुक्रवारी पुरातत्व विभागाच्या वकिलांनी न्यायालयाकडे आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली.
तांत्रिक अहवाल उपलब्ध नसल्यामुळे पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाला 15 दिवसांची मुदत वाढवून मिळण्याची मागणी केली होती. केली होती, असे हिंदूंच्या बाजूचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले.
मात्र न्यायालयाने 10 दिवसांची मुदत वाढवून देण्यास मंजूरी दिली आहे. हा अहवाल आता 28 नोव्हेंबरला न्यायालयात सादर केला जाणे अपेक्षित आहे.
17 व्या शतकात बांधण्यात आलेल्या ज्ञानव्यापी मशिदीच्या ठिकाणी आगोदर हिंदूंचे मंदिर होते का, हे या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारे निष्पन्न केले जाणार आहे.




