पिंपरी | महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून शाळेची पाहणी

जाधववाडी, (वार्ताहर) – बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या शाळांची पाहणी सुरु केली आहे. कुदळवाडी येथील पालिकेच्या शाळा क्रमांक ८९ ला शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, प्रशासन अधिकारी संगिता बांगर व समन्वयक विलास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
अतिशय उत्कृष्ट प्रकारचे फर्निचर बनवल्याचे सांगून मनपाने खासगी शाळेपेक्षा उत्तम भौतिक सुविधा दिल्याचे कबूल केले . शाळेतील विद्यार्थ्यासाठी ऑनलाइन हजेरीसाठी मशीन बसविले असून हे ग्रामस्थ व शिक्षकांच्या सहकार्यामुळे हे साध्य झाल्याचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन यांनी सांगितले. लवकरच आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन केले जाणार आहे.
संगिता बांगर प्रशासन अधिकारी यांनी शाळेतील पटसंख्या ११६८ असल्याने शिक्षक संख्या पुरेशी नसल्याने लवकरच मानधन तत्त्वावर शिक्षक पाठविले जातील, असे आश्वासन दिले.
राजेंद्र अहिरे यांनी शाळेतील इयत्ता ३री च्या वर्गाचे मूल्यमापन करताना वर्गातील सर्व विद्यार्थी मराठी व इंग्रजीचे अस्खलित पणे वाचन करताना दिसले.
सर्व शिक्षकांसमोर बोलताना त्त्यांनी संबंधित शिक्षक विठ्ठल बगाटे यांचे कौतुक केले व शिक्षकांनी आपली मुले मनपाच्या शाळेत दाखल केली पाहिजे.
शाळेची स्वच्छता, नियोजन व गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे नमूद केले. विलास पाटील प्रकल्प प्रमुख (समग्र शिक्षा अभियान) यांनी शालेय फलक, प्रथमोपचार पेटी, तक्रार पेटी, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविल्याबद्दल मुख्याध्यापकांचे कौतुक केले.





