‘….म्हणून रोशनसिंग सोढी अचानक बेपत्ता झाला’; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन, काय म्हणाला पाहा…

Gurucharan Singh । Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोचे अभिनेते गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्याभरापासून अभिनेत्याचा पत्ता नाही. त्याचे कुटुंब आणि चाहते सर्वच जण चिंतेत आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, आपल्या मजेशीर शैलीने सगळ्यांना हसवणारा आणि नेहमी आनंदी राहण्याचा सकारात्मक संदेश देणारा ‘रोशन सिंग सोधी’ कुठे गेला?
गुरुचरण सिंह 22 एप्रिलला मुंबईला रवाना होणार होते. रात्री 8.30 वाजता ते दिल्ली विमानतळावर पोहोचले, पण त्यांनी प्रवास केला नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेता आपली बॅग घेऊन रस्त्यावरून चालताना दिसला. गुरुचरण सिंह बेपत्ता असल्यामुळे कुटूंबियांच्या मनात कुठे जात होता, त्याचे फ्लाइट का चुकले, त्याचे कोणीतरी खरोखरच अपहरण केले आहे का, असे प्रश्न आले.
गुरूचरण सिंगने शेवटचं दिल्लीच्या एका एटीएमवरून सात हजार रूपये काढल्याचे पोलिस तपासात उघड झालं होत. तेव्हा पासून अभिनेत्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, आता गुरुचरण सिंह आपल्या घरी परतला आहे. गुरुचरण सिंग हा धार्मिक यात्रेवर गेला होता. गुरुचरण सिंग हा वापस आल्याने त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतलाय.
गुरुचरण सिंगच्या प्रकरणात चाैकशी करण्यासाठी पोलिस थेट तारक मेहता का उल्टा चश्माच्या सेटवर देखील पोहचले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुखरूप आपल्या घरी आला आहे. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः गुरुचरण सिंह याने भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत अभिनेत्यानं सर्व गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.
यावेळी बोलताना गुरुचरण सिंह म्हणाला की, “सध्या यावर मी काहीही बोलू शकत नाही कारण काही कायदेशीर प्रक्रिया बाकी आहेत. ज्यामुळे मी नंतर सर्वकाही सांगेल. काहीही वक्तव्य करण्याआधी मला काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. एकदा सर्व प्रक्रिय पूर्ण झाल्यानंतर मी सर्वकाही बोलेल.’ असं अभिनेता म्हणाला.
पुढे गुरुचरण सिंग म्हणाला, ‘माझ्याकडून जे काही पूर्ण करायचं होतं ते झालं आहे. आता आई – वडीयांकडून काही कायदेशीर प्रक्रिया बाकी आहेत. निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे मी थोडी प्रतीक्षा केली. न्यायालयाची देखील प्रक्रिया सध्या बाकी आहे. मी असा निर्णय का घेतला? सर्व काही योग्य वेळ आल्यानंतर सांगेल’.
यावेळी स्वतःच्या आरोग्याबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आता माझी प्रकृती स्थिर आहे. डोकेदुखी त्रास होता. पण आता सर्वत्रकाही ठिक आहे. हळू हळू सर्व काही ठिक होईल…’ असं देखील गुरुचरण सिंग म्हणाला.





